पिकांच्या नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण करावेत; एकही शेतकरी वंचित राहू नये याची काळजी घ्या-जिल्हाधिका-यांच्या अधिका-यांंना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 01:18 PM2020-10-25T13:18:15+5:302020-10-25T13:19:39+5:30
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत. याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या.
घारगाव : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत. याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी रविवारी (दि. २४) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या संगमनेर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. चंदनापुरी व पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला.
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. याकरिता तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामस्तरीय अधिकाºयांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे. पंचनामे करताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही. याची खबरदारी घ्यावी. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई शेतकºयास मिळावी, यासाठी सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी केल्या.
नांदूर खंदरमाळ शिवारातील निलेश सखाहरी करंजेकर, सुनील म्हस्के यांच्या शेतातील लाल कांदे, भुईमूग, सोयाबीन यांच्या शेतातील नुकसानग्रस्त पिकाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी केली. उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदी यावेळी उपस्थित होते.