गाळप, उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 06:41 PM2018-12-19T18:41:51+5:302018-12-19T18:41:53+5:30

साखर आयुक्तालयांतर्गत असलेल्या पुणे विभागाने सन २०१८-१९ च्या ऊस गळीत हंगामात ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे

Crop production, Pune division is leading in the production | गाळप, उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर

गाळप, उत्पादनात पुणे विभाग आघाडीवर

मिलिंदकुमार साळवे
अहमदनगर : साखर आयुक्तालयांतर्गत असलेल्या पुणे विभागाने सन २०१८-१९ च्या ऊस गळीत हंगामात ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. यात कोल्हापूर विभाग दुसऱ्या स्थानावर, तर अहमदनगर विभाग तिसºया क्रमांकावर आहे. पुणे विभाग गाळप, उत्पादनात आघाडीवर असले तरी ११.१९ टक्के मिळविणाºया कोल्हापूर विभागाने साखर उताºयात सध्या पहिला क्रमांक पटकाविला आहे.
साखर आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार १६ डिसेंबरअखेर राज्यातील ९६ सहकारी व ८० खासगी अशा एकूण १७६ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सध्या सुरू आहे. साखर आयुक्तालयांतर्गत असलेल्या कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती व नागपूर अशा ७ विभागातील १७६ कारखान्यांमधून आतापर्यंत ३०१.४४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. त्यातून ३०८.६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यात सर्वाधिक १२८.९४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप पुणे विभागातील ५८ कारखान्यांनी केले आहे. याद्वारे १३०.९४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांमधून ६३.०२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून ७०.५२ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
अहमदनगर विभागातील १५ सहकारी व १० खासगी अशा एकूण २५ कारखान्यांनी ४६.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ४६.३६ लाख क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.
२२ कारखाने सुरू असलेल्या औरंगाबाद विभागाचा गाळप व साखर उत्पादनात राज्यात चौथा क्रमांक आहे. या विभागात आतापर्यंत २७.२३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपातून २५.४४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे.
विभागनिहाय साखर उतारा
कोल्हापूर ११.१९ टक्के, एकमेव खासगी कारखाना सुरू असलेल्या अमरावती विभागाने १०.६० टक्के साखर उताºयासह राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. पुणे विभागाचा १०.१६ टक्के, अहमदनगर विभागाचा १०. ०२ टक्के उतारा आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२४ टक्के एवढा आहे. राज्यात १६ डिसेंबरअखेर ३०१.४४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्यातून ३०८.६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

Web Title: Crop production, Pune division is leading in the production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.