बीबीएफ यंत्रणाचा वापर केल्यास अतिपावसातही पीक सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:00+5:302021-06-16T04:29:00+5:30
नगर तालुक्यातील डोंगरगण येथे कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप, बीज प्रक्रिया व बीबीएफ ...
नगर तालुक्यातील डोंगरगण येथे कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप, बीज प्रक्रिया व बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिकाचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवले बोलत होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी सहायक अभिजित डुक्रे, डोंगरगणचे सरपंच वैशाली मते, उपसरपंच संतोष पटारे, सदस्य सर्जेराव मते, बाबासाहेब काळे, कांताबाई भूमकर, भीमाबाई कोकाटे, आशाबाई कदम, प्रगतिशील शेतकरी अण्णा मते, भानुदास खेत्री, नीलेश मते, किसन पवार आदी उपस्थित होते.
यावेळी नवले यांनी महाडीबीटीअंतर्गत नोंदणी, निवड प्रक्र्रिया, यांत्रिकीकरण योजना, १८ इंचावर बीबीएफ पेरणी यंत्राचा वापर व फायदे, शेतीमाल थेट विक्री योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी यांनी आभार मानले.
-----------
फोटो १४ डोंगरगण
ओळी-
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विभागाच्या वतीने डोंगरगण येथे बीज प्रक्रिया व बीबीएफ पेरणी प्रात्यक्षिक कार्यक्रम डोंगरगण येथे झाला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी आदी.