३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे शुंभारभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 06:57 PM2019-07-02T18:57:39+5:302019-07-02T18:57:45+5:30

३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथील डोंगरावर ५०१ झाडाचे रोपन करण्यात आले.

Crores of 33 million tree plantation campaign at AdarartA Hivar Bazar | ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे शुंभारभ

३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे शुंभारभ

निंबळक : ३३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत आदर्श गाव हिवरे बाजार येथील डोंगरावर ५०१ झाडाचे रोपन करण्यात आले. या उपक्रमाचा वनविभागाचे उप वनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्यात यंदा एक कोटी रोपांची लागवड करण्यात येणार आह़े
यावेळी आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनिल पाटील, सुनिल थेटे, अनिल गावडे, सहदेव पवार, हरीभाऊ ठाणगे, यशवंत माध्यमिक विदयालयाचे मुख्याध्यापक मुरलीधर अमृते, दिपक ठाणगे, कैलास खैरे, नंदकुमार झावरे, नीता सोनवणे यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण मोहिम शुभारंभा नंतर प्रशासकीय अधिका -यांनी शालेय रोपवाटीकेस भेट देऊन माहिती घेतली.

 

Web Title: Crores of 33 million tree plantation campaign at AdarartA Hivar Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.