उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:02+5:302020-12-30T04:28:02+5:30
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंगळवारी निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. येथील व्यवस्थेची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकारी ...
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंगळवारी निवडणूक अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. येथील व्यवस्थेची पाहणी करून निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटीत यांच्याशी चर्चा केली. ३० निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवडणूक संबंधित संपूर्ण माहिती आहे का? तसेच प्रक्रियेत काही अडचण आहे का? याबाबत विचारणा केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या उमेदवारांशीही त्यांनी संवाद साधला. अर्ज भरताना काही अडचण येतात का? अडचण येत असेल तर अधिकारी मदत करतात? असे प्रश्न त्यांनी उमेदवारांना केले. यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात भेट दिली. येथील स्वच्छतेविषयी असमाधान व्यक्त केले. लटकलेल्या ट्यूब लाईट, फुटलेल्या काचा पाहून याची व्यवस्थित देखभाल करण्याची सूचना केली.
...
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोनच दिवस उरल्याने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या ( बुधवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उद्याही उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.
...
फोटो-(छाया-नागेश सोनवणे)