गर्दी वाढताच, नगरला कोरोना पुन्हा वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:27+5:302021-06-11T04:15:27+5:30

अहमदनगर : गत सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने बाजारातील गर्दी वाढू लागली आहे. त्यासोबतच रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात ...

As the crowd grew, the town began to grow corona again | गर्दी वाढताच, नगरला कोरोना पुन्हा वाढू लागला

गर्दी वाढताच, नगरला कोरोना पुन्हा वाढू लागला

अहमदनगर : गत सोमवारपासून लॉकडाऊन शिथिल झाल्याने बाजारातील गर्दी वाढू लागली आहे. त्यासोबतच रुग्णसंख्याही वाढू लागली आहे. गुरुवारी जिल्ह्यात आठशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले.

अहमदनगर जिल्हा निर्बंध स्तर-१मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील सर्व निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले. त्यामुळे सर्व बाजारपेठ खुली झाली, दुकाने उघडली, भाजीपाल्यासह इतर खरेदीसाठी गर्दी वाढली. नियमांचे पालन करण्याबाबत निष्काळजीपणाही वाढला. एक जूनपासून कमी होत जाणारी कोरोनाची रुग्णसंख्या गुरुवारी अचानक वाढली. जिल्ह्यात ८६८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध उठवले त्यादिवशी म्हणजे ७ जूनला ५३० रुग्ण होते. ती संख्या गुरुवारी ८६८वर गेली आहे. लॉकडाऊन उठवल्यामुळे पुन्हा संख्या वाढत आहे की काय? अशी शंका यातून निर्माण झाली आहे. जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ४ हजार ५५४ इतकी आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४६४ आणि अँटिजन चाचणीत ३०१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३९), राहाता (२२), संगमनेर (५५), श्रीरामपूर (३४), नेवासे (१११), नगर तालुका (४३), पाथर्डी (९५), अकोले (६८), कोपरगाव (६९), कर्जत (३७), पारनेर (७४), राहुरी (३६), भिंगार (६), शेवगाव (८३), जामखेड (११), श्रीगोंदे (७३), इतर जिल्हा (११) येथील रुग्णांचा समावेश आहे. नगर शहरातही गत तीन दिवस २०, २२, १० अशी रुग्णसंख्या आढळून आली होती. ती गुरुवारी थेट ३९वर पोहोचली आहे. नेवासा तालुक्यात सर्वाधिक १११ रुग्ण आढळले आहेत.

----------

दहा दिवसातील पॉझिटिव्ह आणि मृत्यूची नोंद

तारीख, पॉझिटिव्ह, मृत्यू

१ जून- १,१५२- २६

२ जून- ८५८- ६४

३ जून- १३२६- २०

४ जून- ७७१-२९

५ जून- ८४३- ५

६ जून- ९१४- ४०

७ जून- ५३०- ३०

८ जून- ५३४- १८

९ जून- ४९९- ४०

१० जून - ८६८- २४

-----------

एकूण कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : २,६२,०८१

उपचार सुरू असलेले रुग्ण : ४,५५४

मृत्यू : ३,७९५

एकूण रुग्ण संख्या : २,७०,४३०

----------

Web Title: As the crowd grew, the town began to grow corona again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.