शासनाचे कडक निर्बंध हरवले गर्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:25 AM2021-04-30T04:25:23+5:302021-04-30T04:25:23+5:30
शहरात नेहमीचा भाजी बाजार नेहरू चौक परिसरात भरतो. तसेच आता इतरही अनेक ठिकाणी भाजी बाजार भरायला लागले आहेत. भाजीपाला ...
शहरात नेहमीचा भाजी बाजार नेहरू चौक परिसरात भरतो. तसेच आता इतरही अनेक ठिकाणी भाजी बाजार भरायला लागले आहेत. भाजीपाला खरेदी करण्यासाठी सगळीकडेच नेहमीसारखी गर्दी होते आहे. सकाळी सात ते अकरा ही वेळ अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्यासाठी ठरवून दिली आहे. त्याच वेळेत बाजारात मोठी गर्दी उसळत आहे. नागरिक शारीरिक अंतर राखण्याचे नियम पाळताना दिसत नाही. अनेकांच्या तोंडाला मास्क देखील नसतो. तर काही जण केवळ औपचारिकता म्हणून अगदी नाकाच्या खाली मास्क घालत आहेत. भाजी बाजारात होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा फैलाव होऊन तो इतरत्र वाढू शकतो. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्वच निर्बंधाचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे संगमनेर नगर परिषद प्रशासनाने भाजी बाजार भरविण्यासंदर्भात काही नियम घालून देणे गरजेचे आहे.