विसापूर जलशयावर पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:34 PM2017-09-25T14:34:14+5:302017-09-25T14:34:30+5:30

कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.

A crowd of tourists on Visapur waterfowl | विसापूर जलशयावर पर्यटकांची गर्दी

विसापूर जलशयावर पर्यटकांची गर्दी

नानासाहेब जठार
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : कुकडी प्रकल्पातील विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील जलाशय दहा वर्षानंतर यंदा भरला आहे. या जलाशयातून सांडव्यावरुन पडणाºया पाण्याच्या धबधबा तयार झाल्याने तो नगर, पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. दररोज हजारो पर्यटक येथील धबधब्यावर मजा लुटण्यासाठी येत आहेत.
विसापूर परिसरातीलच नाही तर  नगर, श्रीगोंदा, शिरुर, पारनेर भागातीलही काही हौशी पर्यटक जलाशयाला भेट देत आहेत. वॉटर फॉलचा आनंद लुटण्यासाठी खर्च करुन दूरवर जाण्याऐवजी पर्यटक विसापूर जलाशयाचे सांडव्याचे वॉटर फॉलला महत्व देत आहेत. सांडव्याचे तीनशे-साडेतीनशे मीटर लांबीचे सांडव्यावरुन पाणी वहात आसल्याने सांडव्याखाली धबधबे तयार झाले असून सेल्फी काढण्यासाठी तरुणाईने गर्दी केले आहे.तरुणांप्रमाणेच महिला व लहान मुलांनी वाहत्या पाण्यात बागडण्यासाठी गर्दी केली आहे.९२७ दशलक्ष घनफूट साठवण क्षमता आसलेल्या धरणाजवळ सायंकाळच्या पहारी विलोभनीय दृष्य तयार होत आहे.

ब्रिटिशकालीन प्रकल्प
विसापूर जलाशयाची मातीची भिंत ७४४० फूट म्हणजे सुमारे सव्वादोन किलोमीटर लांब व ८४ फूट उंच आहे. हे धरण बांधताना इंग्रजांनी केवळ दगड व मातीचाच वापर केला. तरीही या धरणातून थेंबभरही पाण्याची गळती होत नाही.  या जलाशयाला शंभर वर्षे पूर्ण झाले असून इंग्रज सरकारने १८९६ ते १९२७ या ३१ वर्षाच्या कालावधीत हंगा नदीवर विसापूर येथे मातीचा बांध टाकून धरण बांधले. १८९६ ते १९०० सालापर्यंत दुष्काळी कामावरील मजुरांकडून काम करुन घेण्यात आले. त्यानंतर १९१७ पर्यंत इतर भागातील मजुरांचा वापर करण्यात आला. १९१७ ते १९२३ या सहा वर्षाच्या कालावधीत विसापूर कारागृहातील बंदिवानांकडून काम करुन घेण्यात आले. त्यावेळी हे धरण बांधण्याठी २१ लाख व कालवा व उपचाºयांच्या कामासाठी १९ लाख असा या प्रकल्पावर केवळ ४० लाख खर्च झाला आहे. या धरणावर २८००० एकर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारकडून करण्यात आला. अशाप्रकारे जुन्या तंत्राचा वापर करुन २७ किलोमीटर कालव्यांसह काम पूर्ण करुन धरण सर्वप्रथम १९२७ साली ओव्हरफ्लो  झाले. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर फ्रेड्रीक हग सायकस यांचे हस्ते २९ नोव्हेंबर १९३४ विसापूर धरणाचे औपचारिक उद्घाटन झाले. ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी सुमारे अर्धा किलोमीटर लांबीचा सांडवा बांधलेला आहे.

Web Title: A crowd of tourists on Visapur waterfowl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.