आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:18+5:302021-09-23T04:23:18+5:30

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातून दौंड -मनमाड या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पुणे-वाराणसी, हावडा व पुणे-पाटणा या तीन रेल्वेमधील आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची ...

Crowds of passengers in reserved coaches | आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची गर्दी

श्रीरामपूर : नगर जिल्ह्यातून दौंड -मनमाड या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पुणे-वाराणसी, हावडा व पुणे-पाटणा या तीन रेल्वेमधील आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे अनेकदा हा रेल्वेचा आरक्षित डबा आहे की सामान्य श्रेणीचा असा समज होतो. डब्यामध्ये प्रवेश करण्यापासून आपले सीट ताब्यात घेईपर्यंत प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते.

कोविड काळात धावत असलेल्या विशेष रेल्वेमध्ये केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवेश मिळतो; मात्र तरीही काही रेल्वेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असतात. विशेषत: सण उत्सवाच्या काळात ही गर्दी वाढते.

जिल्ह्यातून उत्तर भारतात जाणाऱ्या पाटणा, वाराणसी व कोलकात्ता या रेल्वेंना मोठी गर्दी असते. अनेकदा या रेल्वेंमधील प्रवासी डब्याच्या दरवाजाजवळ आपल्या वस्तू रचून ठेवतात. त्यामुळे स्थानकावरून चढणाऱ्या प्रवाशांना दरवाजा खोलता येत नाही. त्यामुळे नाईलाजाने दुसऱ्या डब्यात प्रवेश करावा लागतो. तेथून पुढे कसरत सुरू होते ती आपल्या आरक्षित सीटपर्यंत पोहोचण्याची; मात्र त्यासाठी घाम गाळावा लागतो. सीट मिळेपर्यंत दोन-चार रेल्वे स्थानक मागे सुटतात.

---------

विक्रेत्यांची गर्दी अधिक

आरक्षित डब्यांमध्ये प्रवाशांबरोबरच चहा, समोसे, पोहे व स्नॅक्सची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची गर्दी असते. त्यामुळे आधीच्या गर्दीत हे लोक मिसळतात. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.

----------

महिला वर्गाचे हाल

रेल्वे प्रवासादरम्यान महिला वर्गाचे जास्त हाल होतात. डब्यांमधील गर्दी पार करत सीटपर्यंतचा प्रवास तसेच रेल्वेमध्ये शौचालयांच्या वापरासाठी त्यांची अधिक अडचण होते.

------------

प्रवासादरम्यान आराम मिळावा तसेच रात्रीची झोप व्हावी या हेतून प्रवासी आरक्षण करतात. मात्र अनेकदा डब्यांमध्ये जास्त गर्दी झाल्याने आरक्षणाचा उपयोग होत नाही.

-रणजित श्रीगोड, अध्यक्ष, प्रवासी संघटना, श्रीरामपूर.

-------

Web Title: Crowds of passengers in reserved coaches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.