कुकडीचे पाणी पेटण्याची चिन्हे

By Admin | Published: May 31, 2014 11:42 PM2014-05-31T23:42:32+5:302014-06-01T00:23:30+5:30

श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याने घोडचे आवर्तन सुटले.

Cuddle water flammable signs | कुकडीचे पाणी पेटण्याची चिन्हे

कुकडीचे पाणी पेटण्याची चिन्हे

श्रीगोंदा : कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांनी प्रतिष्ठापणाला लावल्याने घोडचे आवर्तन सुटले. मात्र पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली कुकडीच्या चाव्या जिल्हाधिकार्‍यांकडे दिल्या. त्यामुळे कुकडीच्या आवर्तनावर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. भविष्यात कुकडी लाभक्षेत्रात पाणी पेटण्याची चिन्हे आहेत. आॅक्टोबर २०१३ मध्ये झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घोडची चार व कुकडीची तीन आवर्तने सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. कुकडी व घोड दोन्ही प्रकल्प आठमाही आहेत. हे प्रकल्प शंभर टक्के भरलेली असताना घोडची चार तर कुकडीची तीन आवर्तने सोडण्याविषयी झालेल्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यकत होत आहे. दरम्यान, घोड धरणाचे आवर्तन सोडण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकार्‍यांनी जी सकारात्मक भूमिका घेतली तिचे लाभक्षेत्रातून स्वागत होत आहे. कुकडी प्रकल्पातील पावणेतीन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा तसेच पिंपळगाव जोगेमधील तीन टीएमसी पाणीसाठा विचारात घेऊन कुकडीचे चौथे आवर्तन शक्य होते, परंतु आवर्तनाचा चेंडू जिल्हाधिकार्‍यांच्या कोर्टात टोलवण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)शेतकर्‍यांना फटका कुकडीच्या आवर्तनाचा डांगोरा पिटला जातो. राजकारणाच्या पोळ्या भाजून घेतल्या जातात. मात्र कुकडीचे आवर्तन कधीच वेळेत सोडले जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसतो. शफीक शेख, शेतकरी, लोणीव्यंकनाथदुटप्पी भूमिका कशासाठी? घोड व कुकडी प्रकल्पात पंधरा टक्केपेक्षा कमी पाणीसाठा असताना जिल्हाधिकारी घोडचे शेतीसाठी आवर्तन सोडण्यास परवानगी देतात, मग कुकडीचे आवर्तन सोडण्यावर दुटप्पी भूमिका कशासाठी? मधुकर शेलार, शेतकरी, बेलवंडी

Web Title: Cuddle water flammable signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.