परिवर्तन केले तरच कुकडीचे पाणी
By Admin | Published: June 2, 2014 12:23 AM2014-06-02T00:23:01+5:302014-06-02T00:37:00+5:30
श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो!
श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो! अगोदर आमदार बदला तर कुकडीचे पाणी शेतकर्यांच्या शेतात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी बेलवंडी येथे बोलताना केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवाजीराव नागवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपट माने होते. नागवडे पुढे म्हणाले की, अण्णासाहेब शेलार यांनी कर्तृत्व आणि विश्वासाच्या बळावर राजकारणात झेप घेतली आहे. भविष्यात सर्वांचा एकत्रीत निर्णय घेऊन राजकारण, समाजकारणात काम करावे लागणार आहे. कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले की, अण्णासाहेब शेलार मन जिंकणारा नेता आहे, असून त्यांची लोकप्रियतेची वेगळी खुबी आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, राष्टÑवादीचे नेते कुकडीच्या पाणी प्रश्नावर जखमेवरचे मीठ चोळण्याचे काम करीत आहे. राजकारणात चुकीचे निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे.राजेंद्र नागवडे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी घेतलेल्या बैठका फार्स आहे. शेतकर्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेला हा पोरखेळ आहे. कैलासराव पाचपुते म्हणाले, कोणत्या तरी एकाच दगडाला शेंदूर लावा म्हणजे कार्यकर्त्यांना कामाला लागता येईल. अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी वाढदिवस साजरा करावा एवढा मोठा माणूस नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. आगामी निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तर सत्ता परिवर्तन अटळ आहे. परंतु नेत्यांना डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. यावेळी डी.एम.भालेराव, सरस्वती डाके, विष्णू जठार, मच्छिंद्र नलगे, मनेष जगताप, सुभाष काळाणे, मनोज इथापे, अशोक काळाणे, सुधीर काळाणे, रमन मुनोत यांची शुभेच्छापर भाषणे झाली. पिंपळगाव पिसा येथे आर.जे. ग्रुप ने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन कुंडलिकराव जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी बापुशेठ गोरे, मनोहर पोटे, महेंद्र वाखारे, मिलिंद दरेकर, जिजाबापू रोडे, सुदाम पवार, एम.डी. शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)