वृक्षारोपणासह त्याचे संवर्धन करा : शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:49+5:302021-06-30T04:14:49+5:30
टाकळी ढोकेश्वर : वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे, असे ...
टाकळी ढोकेश्वर : वृक्षांना मनुष्याच्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याची जाण ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करावे, असे प्रतिपादन मियावाकी प्रकल्पाच्या प्रमुख गीतांजली शेळके यांनी केले.
मियावाकी प्रकल्पाद्वारे कमी जागेत विविध प्रजातीचे घनदाट वृक्षारोपण करून त्याचे १ वर्ष योग्य संवर्धन केल्यास फक्त वरच्या बाजूने सूर्यप्रकाश मिळाल्याने झाडांची दहापट उंच वाढ होते व परिसर घनदाट होतो. पिंपरी जलसेनच्या पाणी फाऊंडेशनच्या सहकार्याने वनराई प्रकल्पाची चार महिन्यात शास्त्रोक्त जोपासणीमुळे वृक्षांची जोमाने वाढ झाली आहे. निसर्गचक्रानुसार वनराईमध्ये विविध पक्षी, फुलपाखरे, मधमाशी तसेच ससे अशा विविध पशुपक्षी प्राण्यांचा वावर सुरू झाला आहे. यातून निसर्गाचा समतोल साधण्यास मदत होत असल्याचे गीतांजली शेळके यांनी सांगितले.
-------
फोटो ओळी
पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथे वृक्षांची जोमाने वाढ झाली आहे.