नवनागापूरला सांस्कृतिक भवन, सभामंडप देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:11+5:302021-06-25T04:16:11+5:30
अहमदनगर : नवनागापूर गावामध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी ६० लाख, तसेच ४ सभामंडप देणार असल्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी ...
अहमदनगर : नवनागापूर गावामध्ये सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी ६० लाख, तसेच ४ सभामंडप देणार असल्याची ग्वाही आमदार नीलेश लंके यांनी दिली.
नवनागापूर येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत मंडळ अस्तित्वात आल्यानंतर आमदार लंके यांनी प्रथम ग्रामपंचायतीला सदिच्छा भेट दिली. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्या हस्ते आमदार लंके यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या वेळी उपसरपंच संगीता सप्रे, सदस्य सागर सप्रे, दीपक गीते, अर्जुन सोनवणे, गोरख गव्हाणे, बाबासाहेब भोर, हेमा चव्हाण, मंगल गोरे, कल्पना गीते, सत्यभामा डोंगरे, संगीता भापकर, रंजना दांगट, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ, ग्रामस्थ रशीद पठाण, संजय चव्हाण, विकास जगताप, विनोद ठुबे, चंद्रभान डोंगरे, बाबासाहेब दांगट, लखन डोंगरे, विलास ढेकणे आदी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार नीलेश लंके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गावामध्ये भव्य सांस्कृतिक भवन उभारणे, सभामंडप बांधणे, नवनागापूर ते वडगाव गुप्ता रस्त्याचे काम करणे, अनुसूचित जाती नवबौद्धांच्या वस्त्यांचा विकास करणे, स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावणे असे विविध प्रश्न सोडवणुकीबाबत आमदार लंके यांना निवेदन देण्यात आले. यातील काही मागण्या तत्काळ मंजूर करण्यात आल्या.
..........
गावाचा विकास आराखडा तयार करा
नवनागापूर हे गाव शहरालगत असल्याने नवनागापूरमध्ये शहराप्रमाणे सुविधा देण्यासाठी गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार नीलेश लंके यांनी दिल्या. तसेच गावात उपकेंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
...............
२३ नवनागापूर लंके