कर्जतची संस्कृती शिंदे राज्याच्या कबड्डी संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:19 AM2021-03-19T04:19:45+5:302021-03-19T04:19:45+5:30
कर्जत : आगामी राष्ट्रीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी राज्याचा मुलींचा संघ नुकताच जाहीर झाला. या संघात कर्जत तालुक्यातील चापडगाव ...
कर्जत : आगामी राष्ट्रीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेसाठी राज्याचा मुलींचा संघ नुकताच जाहीर झाला. या संघात कर्जत तालुक्यातील चापडगाव येथील कबड्डीपटू संस्कृती जयदीप शिंदे हिची निवड करण्यात आली.
४७वी राष्ट्रीय कुमारी गट अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा तेलंगणा येथे होणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा मुलींचा कबड्डी संघ घोषित करण्यात आला आहे. या संघात कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची अष्टपैलू कबड्डीपटू संस्कृती जयदीप शिंदे हिची निवड करण्यात आली आहे. ती उत्कृष्ट रायडर आहे. तसेच कॉर्नरवर ती उत्कृष्ट कामगिरी बजावते. संस्कृती सध्या दादा पाटील महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे. ती चापडगाव येथील रहिवासी आहेत. संस्कृती शिंदे हिचे वडील शेतकरी आहेत.
राज्याचा मुलींचा कबड्डी संघ निवडीसाठी पनवेल येथे विविध शिबिर झाले. येथे १०० मुलींमधून २० मुलींची निवड करण्यात आली. त्यांना नाशिक येथे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर बारा खेळाडूंचा राज्य संघ निवडण्यात आला. यामध्ये संस्कृतीची निवड झाली. या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, कर्जत तालुका क्रीडा समिती, माजी विद्यार्थी संघटना यांनी संस्कृतीचे कौतुक केले.
---
१८ संस्कृती शिंदे