नगरमध्ये सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:15 AM2021-06-27T04:15:22+5:302021-06-27T04:15:22+5:30

जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. २६) याबाबत आदेश काढले. पाॅझिटिव्हिटी रेट व ॲाक्सिजन बेडवरील रुग्णांचे प्रमाण या ...

Curfew again in the city after 5 pm | नगरमध्ये सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

नगरमध्ये सायंकाळी पाचनंतर पुन्हा संचारबंदी

जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी शनिवारी (दि. २६) याबाबत आदेश काढले. पाॅझिटिव्हिटी रेट व ॲाक्सिजन बेडवरील रुग्णांचे प्रमाण या आधारे निर्बंधस्तर जाहीर करण्यात आले होते. त्यात नगर जिल्हा क्रमांक एकमध्ये असल्याने ६ जूनपासून जिल्ह्यातील सर्व निर्बंध उठवण्यात येऊन व्यवहार सुरळीत झाले; परंतु आता २० दिवसांनंतर नगर जिल्ह्याचा समावेश स्तर तीनमध्ये झाला असल्याने नवीन निर्बंध शासनाकडून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार सायंकाळी ५ ते सकाळी ५ या वेळेत वैद्यकीय कारण वगळता कोणासही बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशामध्ये नमूद नसलेल्या बाबींबाबत यापूर्वीचे आदेश लागू राहतील.

------------------------------

असे असतील नवीन निर्बंध

उपक्रम कालावधी

अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी ४

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ (शनिवार, रविवार पूर्ण बंद)

माॅल्स, थिएटर्स (नाट्यगृह) पूर्णपणे बंद

हाॅटेल, रेस्टाॅरंट ५० टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दु. ४ (४ नंतर केवळ पार्सल. शनिवार, रविवार केवळ पार्सल)

सार्वजनिक ठिकाणे, खुले मैदाने, सायकलिंग व माॅर्निंग वाॅक सकाळी ५ ते सकाळी ९

खासगी आस्थापना, कार्यालये दुपारी ४ वाजेपर्यंत

खासगी, सरकारी कार्यालयीन उपस्थिती ५० टक्के

खेळ (मैदानावरील) सकाळी ५ ते सकाळी ९, सायं ६ ते रात्री ९

सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ (५० टक्के मर्यादेत)

विवाह समारंभ ५० व्यक्तींच्या उपस्थितीत

अंत्यविधी २० व्यक्तींच्या उपस्थितीत

स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था यांच्या बैठका, निवडणुका, वार्षिक सभा आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत

बांधकाम फक्त बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांकरवी किंवा कामगारांना ४ वाजता सोडणे बंधनकारक राहील.

कृषी संबंधित दुकाने, आस्थापना सकाळी ७ ते दुपारी ४

ई-काॅमर्स (वस्तू व सेवा) नियमितपणे सुरू राहतील

जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर सकाळी ७ ते दु. ४ (५० टक्के क्षमतेने)

सार्वजनिक बस वाहतूक १०० टक्के क्षमतेने

कार्गो वाहतूक (केवळ ३ व्यक्ती) नियमित सुरू राहील.

आंतरजिल्हा प्रवास (खासगी बस, कार, टॅक्सी) नियमित सुरू. तथापि, स्तर ५ मधील जिल्ह्यांत जाण्याकरिता निर्बंध. तेथे थांबणार असाल तर ई-पास आवश्यक.

उत्पादन घटक, कंपन्या नियमित सुरू राहील.

Web Title: Curfew again in the city after 5 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.