संगमनेर महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:54+5:302021-06-11T04:14:54+5:30

डॉ. पराग काळकर (अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाणिज्य विद्याशाखा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. ...

Curriculum Reconstruction Workshop at Sangamner College | संगमनेर महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात

संगमनेर महाविद्यालयात अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळा उत्साहात

डॉ. पराग काळकर (अधिष्ठाता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, वाणिज्य विद्याशाखा) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. देवेंद्र दगडे, प्रकाश हंबड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड व बिझिनेस लॉ बोर्डचे सदस्य, आदी उपस्थित होते. डॉ. काळकर म्हणाले, अभ्यासक्रम शिकविताना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सूचना व समस्या या महत्त्वाच्या असतात. त्यास अनुसरून अभ्यासक्रम बदलातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळेल. अभ्यासक्रम बदलाच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आधुनिक आणि अपेक्षित ज्ञान देऊन विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराचे कौशल्य निर्माण करण्याचे कार्य हे अभ्यासक्रम मंडळाची जबाबदारी आहे. असे डॉ. काळकर म्हणाले.

प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय संदीप वडघुले यांनी करून दिला. प्रा. सारिका पेरणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ललिता मालुसरे यांनी आभार मानले.

Web Title: Curriculum Reconstruction Workshop at Sangamner College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.