जेऊर येथील संतुकनाथ मठाच्या वादावर पडदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:21 AM2021-07-31T04:21:53+5:302021-07-31T04:21:53+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या मठातील वादावर श्री काळभैरवनाथ देवस्थान सोनारी (जि. उस्मानाबाद) येथील मठाधिपती पीर ...
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या मठातील वादावर श्री काळभैरवनाथ देवस्थान सोनारी (जि. उस्मानाबाद) येथील मठाधिपती पीर योगी शामनाथजी महाराज व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्थीने पडदा पडला आहे.
जेऊर येथे श्री काळभैरवनाथ गुरूगादीच्या संतुकनाथ बाबांची संजीवन समाधी असून जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. येथे संतुकनाथ सेवा मंडळाकडून पंचवीस वर्षांपासून पूजा व आरती करण्यात येत आहे. गावातील काही लोकांनी आरतीस मज्जाव केल्याने वातावरण चांगलेच चिघळले होते. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले होते. संतुकनाथ देवस्थान श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान सोनारी (जि. उस्मानाबाद) यांच्या अधिपत्याखाली येत असल्याने तेथील मठाधिपती पीर योगी श्यामनाथजी महाराज यांनी गुरुवारी (दि. २९) वादाच्या पार्श्वभूमीवर जेऊर येथे भेट दिली. त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. दोघांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला आहे.
---
अधिकार शिंदे कुटुंबीयांकडे
येथील शेतजमीन व देवस्थानवर शिंदे परिवाराचा वंशपरंपरेने अधिकार राहणार आहे. राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, नवनाथ शिंदे, विलास शिंदे यांच्या अधिकाराखाली देवस्थानचे कामकाज चालणार आहे.
----
संतुकनाथ सेवा मंडळ करणार आरती
संतुकनाथ सेवा मंडळ येथे २५ वर्षांपासून आरती करत आहे. त्यांना संध्याकाळच्या आरतीसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच सर्व जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी येऊ शकतात.
---
श्री संतुकनाथ महाराजांची संजीवन समाधी हे धार्मिकस्थळ आहे. धार्मिकस्थळी कोणत्याही प्रकारचे राजकारण आणू नये.
-शिवाजी कर्डिले,
माजी आमदार
---
३० जेऊर संकुल
जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या मठातील वादाबाबत चर्चेसाठी आयोजित बैठकीत पीर योगी शामनाथजी महाराज व माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते.
300721\img-20210730-wa0291.jpg
जेऊर फोटो