नगरसेवकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:12+5:302021-02-23T04:31:12+5:30

राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवक एकापाठोपाठ एक राजीनामा देण्याची ...

The curtain did not fall on the displeasure of the corporators | नगरसेवकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडेना

नगरसेवकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडेना

राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सत्ताधारी गटातील नाराज नगरसेवक एकापाठोपाठ एक राजीनामा देण्याची भाषा करीत आहेत. या नगरसेवकांची शनिवारी (दि. २०) सकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत तीन तास नाराज नगरसेवकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही.

नगरपालिकेत चार दिवसांपूर्वी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा गटनेते सचिन दुस यांच्याकडे दिला. परंतु त्यांनी राजीनामा स्वीकारला नाही. मुख्याधिकारी अजित निकत यांच्या दालनात गटनेते सचिन दुस, मुख्याधिकारी निकत व एक पत्रकार यांनी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांची समजूत काढली. राजीनामा देऊ नका. शांत मनाने एकदा विचार करा, असे सांगितले. यावर वाणी तावातावाने निघून गेले. दोन दिवसांनी पुन्हा येईन. राजीनामा देईल, असा इशारा त्यांनी जाता जाता दिला. काही महिन्यांपूर्वी आदिनाथ कराळे यांनी राजीनामा दिला होता. परंतु तो मंजूर करण्यात आला नाही.

नगरसेवकांची नाराजी व राजीनामा नाट्य एकापाठोपाठ घटना घडल्यामुळे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन दुस यांनी शनिवारी सकाळी बागायत पीक सोसायटीच्या सभागृहात सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राजीनामा देणारे नगरसेवक या विषयावर प्रथम चर्चा करण्यात आली. राजीनामा देण्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. समोर आलेली कारणे यावर विचार विनिमय करू. यापुढे असे घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे ठरले. नगरसेवकांची नाराजी काय आहे हे जाणून घेण्यासाठी नगरसेवकांना कोणाची काय नाराजी आहे हे याच बैठकीत स्पष्ट सांगा असे नगराध्यक्ष कदम यांनी फर्मान सोडले. नाराज नगरसेवकांनी आपली नाराजी बोलून दाखविली आहे. त्यामध्ये बहुतांशी नगरसेवकांच्या नगरपालिकेत व पालिकेशी संबंधित कार्यक्रमात मानसन्मान मिळत नाही. आम्ही नावालाच नगरसेवक आहोत. आमचे पालिका अधिकारी सुद्धा ऐकत नाहीत. अशा अनेक तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. महिला नगरसेवकांनीही त्यात सुरात सूर मिसळला अशी माहिती आहे.

......

नाराज नगरसेवकांनी वेळच्यावेळी समस्या मांडल्या तर त्यावर मार्ग काढता येऊ शकतो. नगरसेवक जर वेळीच बोलणार नसतील नगरसेवकांच्या समस्या कशा समजणार? नगरसेवकांशी चर्चा केली पाहिजे. चर्चेतून मार्ग निघतो. शांत राहून राजीनाम्याची भाषा करणे म्हणजे समस्यांचे उत्तर नाही, असे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, गटनेते सचिन दुस यांनी या नगरसेवकांना सांगितल्याची माहिती आहे.

....

Web Title: The curtain did not fall on the displeasure of the corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.