थकबाकी न भरल्याने केडगावात जप्तीची कारवाई : मालमत्तेचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:28 PM2018-06-21T14:28:35+5:302018-06-21T14:28:51+5:30

मागील आठवड्यात मालमत्ता थकबाकी न भरल्याने नळजोड बंद करण्याची मोहीम मनपाच्या केडगाव विभागामार्फत सुरु करण्यात आली.

Custody seizure action in Kedgah due to non-payment of dues: Property will be auctioned | थकबाकी न भरल्याने केडगावात जप्तीची कारवाई : मालमत्तेचा होणार लिलाव

थकबाकी न भरल्याने केडगावात जप्तीची कारवाई : मालमत्तेचा होणार लिलाव

केडगाव : मागील आठवड्यात मालमत्ता थकबाकी न भरल्याने नळजोड बंद करण्याची मोहीम मनपाच्या केडगाव विभागामार्फत सुरु करण्यात आली. आजही हि कारवाई करून मालमत्ता जप्त करण्यात आली असून २१ दिवसात थकबाकीची रक्कम न भरल्यास लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचा इशारा मनपाने दिला आहे.

मागील आठवड्यात केडगाव मधील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम राबविण्यात आली.यात जास्त थकबाकी असणा?्या मालमत्ता धारकांचे नळजोड बंद करण्यात आले.यामुळे कारवीची धास्ती घेऊन अनेक थकबाकीदार स्वतहून पुढे येऊन थकबाकी भरत आहेत.आज जिल्हाधिकारी व आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, विभाग प्रमुख दिलीप कोतकर, राजू सराईकर, विजय चौरे, तुळशीराम जगधने यांच्या पथकाने भंडारी-सावज अपार्टमेंट मधील तळघर मालमत्ता धारक रमणलाल बोरा यांच्या नावाने मिळकत असून त्याचा वापर देसरडा हे करीत आहेत. त्यांची थकबाकी शास्तीसह १ लाख ४९ हजार ९३७ इतकी असून ती न भरल्याने आज मनपाने हि मालमत्ता जप्तीची कारवाई केली. २१ दिवसात थकबाकी न भरल्यास लिलाव प्रक्रिया करण्याचा इशारा देण्यात आला.

Web Title: Custody seizure action in Kedgah due to non-payment of dues: Property will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.