मधुकर काटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:02+5:302021-03-31T04:21:02+5:30
शेवगाव : आबासाहेब काकडे विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मधुकर मारुती काटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ वर्षी, रविवारी ...
शेवगाव : आबासाहेब काकडे विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य मधुकर मारुती काटे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ वर्षी, रविवारी (दि. २८) निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक महेश शेटे यांचे वडील होत.
................
विमल कुलकर्णी
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील विमल विठ्ठल कुलकर्णी (वय ८२) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, तीन नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. विजय कुलकर्णी आणि माजी कृषी अधिकारी दिलीप कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होत.
................
मधुकर सदाफुले
जामखेड : मधुकरराव गंगाराम सदाफुले (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि. २९) निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. मधुकर सदाफुले यांनी महाराष्ट्र शासनाचे उत्पादन शुल्क खात्यात अधिकारी म्हणून सेवा केली होती. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उत्कृष्ट काम केले.
..............
मदिनाबी शेख
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील मदिनाबी शहानूर शेख (वय ७८) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, एक सून, दोन नातू, एक नात, पणतू असा मोठा परिवार आहे. पाचेगाव येथील शहाजानुबी शेख यांच्या त्या मातोश्री तर समीर शेख आणि सलीम शेख यांच्या त्या आजी होत.
....................
दशरथ महाराज साबळे
कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील ह. भ. प. दशरथ महाराज साबळे यांचे रविवारी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. साबळे महाराज बालपणापासून सरला बेटातील वैकुंठवासी महंत नारायणगिरी महाराजांचे शिष्य होते. त्यांचा पंचक्रोशीतील सप्ताह, भजन, कीर्तन, प्रवचन, काकडा यात शेवटपर्यत सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंड असा परिवार आहे. येथील ग्रामपंचायत कर्मचारी भरत साबळे यांचे ते वडील होत.