अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:29 AM2021-06-16T04:29:27+5:302021-06-16T04:29:27+5:30

पारनेर : एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना, आज देशभरातील सायकलस्वारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे केलेले आयोजन राज्यासाठी ...

Cycle rally on the occasion of Anna Hazare's birthday | अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

पारनेर : एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना, आज देशभरातील सायकलस्वारांनी व कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅलीचे केलेले आयोजन राज्यासाठी व देशासाठी खूप महत्त्वाचे आहे. आज पेट्रोल, डिझेल, कोळसा, रॉकेल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होत असून, त्याचे अनेक नैसर्गिक संकटात रूपांतर होत आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांनी राळेगणसिद्धीत सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धी परिवाराने सायकल रॅली आयोजित केली होती. या रॅलीमध्ये देशभरातून २० हजार सायकलस्वारांनी सहभाग घेत, तब्बल २ लाख ५० हजार किमी एवढे अंतर सायकलिंगद्वारे पार करत, हजारे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. ही सायकल रॅली पारनेर येथे पोहोचल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्वांचे स्वागत केले.

या सायकल रॅलीमध्ये सुरेश पठारे, दादा लक्ष्मण पठारे, कमल पंत, एकनाथ भालेकर, लाभेश औटी, दादा महादू पठारे, सुनील हजारे, श्यामराव पठाडे, विनोद गोळे, शंकर नगरे, उदय शेरकर, गणेश भापकर, आकाश पठारे, सुशांतराजे देशमुख, स्वप्निल मापारी, अक्षय जाधव, नाना आवारी, हनुमंत पठारे, भूषण गाजरे, स्वप्निल पठारे, यश पठारे, सुशांत शिंदे आणि प्रणव गाजरे आदी सायकलस्वारांनी सहभाग घेत, तब्बल ३७ किमीचा प्रवास करत अण्णांना वाढदिवसाची भेट दिली. यावेळी रॅलीमध्ये ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा’ अशा घोषणा देण्यात आल्या. माजी सरपंच जयसिंग मापारी, डॉ.गणेश पोटे, पंकज तिकोणे, गणेश भोसले, डॉ.राहुल पोटे आदींनी या उपक्रमासाठी मदत केली.

..........................

अण्णांचा तरुणांना सल्ला

वडापाव, मिसळ, पावभाजी, बर्गर, पिज्जा यांसारखे फास्टफूड असलेले पदार्थ शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे ते खाऊ नयेत. त्याऐवजी मोड आलेले कडधान्य, काजू बदाम, दूध असे पदार्थ खावेत. यातून शरीराची झालेली झीज भरून निघते, असा सल्ला अण्णा हजारे यांनी तरुणांना दिला.

...........................

सायकल रॅली ही पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत चांगला उपक्रम आहे. सायकलने व्यायाम होतो. त्यामुळे शरीर चांगले व निरोगी राहण्यास मदत होते. अशा उपक्रमांना माझा कायम पाठिंबा असेल.

- अण्णा हजार, ज्येष्ठ समाजसेवक

Web Title: Cycle rally on the occasion of Anna Hazare's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.