चक्रीवादळाने संगमनेर तालुक्यात सर्वाधिक घरांची पडझड, पारनेर तालुक्यात पिकांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 06:13 PM2020-06-04T18:13:31+5:302020-06-04T18:13:39+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात ७६४ घरांची हानी झाली. अकोले तालुक्यात ४५ कच्च्या घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर तालुक्यात सर्वाधित ५३१ घरांचे नुकसान झाले. तेथे कच्ची दहा घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पारनेर (४४), राहुरी (१७),कोपरगाव (१०), श्रीरामपूर (१८) श्रीगोंदा (१३), कर्जत (३), नेवासा (८), राहाता (६) येथील घरांचे अंशत: नुकसान झाले. संगमनेर (६), राहुरी (७) आणि अकोले (८) येथे पक्क्या घरांचीही पडझड झाली आहे. अकोले तालुक्यात १५ झोपड्या वादळात उडाल्या. इतरही तालुक्यात कमी-जास्त नुकसान झाले.

निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात अकोले तालुक्यात एकाचा मृत्यू झाला, तर २३ जनावरे दगावली आहेत. साडेसातशेपेक्षा जास्त घरांना हानी पोहोचली आहे, तर ६३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. चक्रीवादळामुळे बुधवारी नगर जिल्ह्यात दिवसभर वादळ, वारे आणि रिमझिम पाऊस होता. जिल्ह्याच्या पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर या भागात सायंकाळनंतर जोरदार वादळ व मुसळधार पाऊस झाला. अकोले तालुक्यातील लहित येथे वादळी वाºयाने अंगावर भिंत कोसळून सागर पांडुरंग चौधरी (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. तो संगमनेर येथील भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगार म्हणून काम करीत होता. वादळी वाºयाने २३ जनावरे दगावली आहेत. अकोले (४), कोपरगाव (१),नेवासा (१),पारनेर (५),संगमनेर (७),श्रीरामपूर (२),राहाता (३) अशा सात तालुक्यात २३ जनावरे दगावली. नगर तालुक्यात एक, संगमनेर तालुक्यात एक, शेवगाव तालुक्यात दोन जण जखमी झाला आहे.
-------
पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान
निसर्ग चक्रीवादळाने पारनेर तालुक्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले. या तालुक्यात ५४० हेक्टरवरील पिकांची हानी झाली. पाथर्डी तालुक्यातील ७६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. कोपरगाव, नेवासा, श्रीगोंदा, श्रीरामपूर या तालुक्यातील पिकांचेही नुकसान झाले.