सॅनिटाइज केल्यानंतरच मिळते सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:43+5:302021-06-01T04:15:43+5:30
श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये गॅस सिलिंडरची घरपोच डिलीव्हरी सेवा सुरू राहिली. या दरम्यान कोविडपासून स्वत:चा व ग्राहकांचा बचाव ...
श्रीरामपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये गॅस सिलिंडरची घरपोच डिलीव्हरी सेवा सुरू राहिली. या दरम्यान कोविडपासून स्वत:चा व ग्राहकांचा बचाव करण्यासाठी डिलीव्हरी बॉय हे विशेष खबरदारी घेत आहेत. सिलिंडरची देवाण-घेवाण करताना शक्यतो प्रत्येक वेळी सॅनिटायझर वापरण्याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या अत्यावश्यक सेवेतून कोविडचा कोणताही प्रादुर्भाव होऊ शकला नाही.
श्रीरामपूर शहरामध्ये सर्व गॅस कंपन्यांकडे मिळून सुमारे ७० ते ८० डिलीव्हरी बाॅय कार्यरत आहेत. यामध्ये घरपोच सेवेबरोबरच रिक्षाद्वारे ग्रामीण भागामध्ये सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऐन कोविडच्या तडाख्यात हे काम अखंडपणे सुरू राहिले. मात्र ग्राहकांना संसर्ग होऊ नये याकरिता गॅस एजन्सी चालकांकडून सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यात आले.
------------
अशी आहे आकडेवारी
श्रीरामपूर शहर व ग्रामीण गॅसधारक : एक लाख
गॅस एजन्सी : पाच
डिलीव्हरी बॉय : १००
लसीकरण झालेली संख्या : ६०
-----------
सिलिंडर सॅनिटाइज केले का?
कोणत्याही गॅस एजन्सीला सर्व सिलिंडर एकाच वेळी सॅनिटाइज करता येणे शक्य नाही. मात्र प्रत्येक वेळी डिलीव्हरी बॉय सिलिंडरची देवाण-घेवाण करताना ते सॅनिटाइज करतो. मास्क आणि शारीरिक अंतर राखूनच सिलिंडर व पैशांचे व्यवहार केले जातात.
------------
डिलीव्हरी बॉय म्हणतात...
आम्ही सर्वच कर्मचारी ग्लोव्हज, सॅनिटायझर व मास्कचा वापर करतो. अशा पद्धतीने काळजी घेऊन ग्राहकांना कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्व नियमांचे पालन करतो.
- संजय पवार, डिलीव्हरी बॉय
-----------
प्रशासनाला पत्रव्यवहार करून सर्वच डिलीव्हरी बॉयचे लसीकरण करण्याची मागणी केलेली आहे. ४५ वयापुढील सर्वच कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याखालील लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे. त्यामुळे फारशी चिंता नाही. मात्र उर्वरित सर्वांना डोस मिळावेत, अशी अपेक्षा आहे.
- उमेश देशपांडे, व्यवस्थापक, गॅस एजन्सी
----------
जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप सिलिंडर डिलीव्हरी बॉय तसेच किराणा दुकानदार यांचे लसीकरण प्राधान्याने करण्याचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र अनेक घटकांनी निवेदने दिलेली आहेत. अद्यापही महावितरण कंपनी तसेच शिक्षक यांचे काही लसीकरण बाकी आहे.
- गणेश शिंदे, मुख्याधिकारी, नगरपालिका, श्रीरामपूर