दहिगावने आरोग्य केंद्रात पावणेदाेन हजार जणांना कोरोना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:51+5:302021-04-25T04:19:51+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपर्यंत (दि.२१) १ हजार ८६० नागरिकांनी कोरोना लस घेतली. कोरोनाचा वाढता ...
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्रात बुधवारपर्यंत (दि.२१) १ हजार ८६० नागरिकांनी कोरोना लस घेतली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, नागरिक कोरोना लसीकरणासाठी आता उत्स्फूर्तपणे हजेरी लावत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास कानडे यांनी दिली.
कोरोना लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ग्रामीण भागात लसीकरणाबाबत उदासीनता असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. त्यामुळे लसीकरण प्रक्रिया कासव गतीने होत होती, परंतु अलीकडच्या दोन-तीन आठवड्यांपासून हे चित्र बदलले आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव टाळायचा असेल, तर लसीकरण अत्यंत गरजेचे आहे, हे आता ग्रामीण भागातील जनतेच्या लक्षात येत आहे. लसीकरणाच्या फायद्याबाबतच्या प्रिंट मीडियाकडून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा ग्रामीण भागातील लसीकरणावर सकारात्मक परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, अनेक वेळा लस उपलब्ध नसल्याने वृद्ध माता-भगिनींना आरोग्य केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. दरम्यान, दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होते. फिजिकल डिस्टन्सचा यावेळी पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळते. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपल्या कामामुळे या गर्दीला नियंत्रित करता येत नाही.