कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या निम्म्यावर घटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:02+5:302021-05-05T04:33:02+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. ...
अहमदनगर : जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्या आतापर्यंत चार हजारांच्या वर जात होती. मात्र, प्रथमच ही संख्या निम्म्यापर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी २१२३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याहून जास्त म्हणजे ३३८८ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत सोमवारी २ हजार १२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२ हजार ३९० इतकी झाली आहे. सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८४०, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८७५ आणि अँटिजन चाचणीत ४०८ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ४४, अकोले २६२, जामखेड ७, कर्जत ८५, नगर ग्रामीण ६०, नेवासा २०, पारनेर ५९, पाथर्डी ६९, राहता २, राहुरी ३, संगमनेर ५०, शेवगाव १०६, श्रीगोंदा ४, श्रीरामपूर ४६, कँटोन्मेंट बोर्ड १८, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर ३५२, अकोले ४, जामखेड ६, कर्जत १३, कोपरगाव १३, नगर ग्रामीण १३२, नेवासा २१, पारनेर २३, पाथर्डी १०, राहाता ११०, राहुरी २४, संगमनेर २९, शेवगाव १९, श्रीगोंदा २२, श्रीरामपूर ६०, कँटोन्मेंट बोर्ड १५ आणि इतर जिल्हा १९ आणि इतर राज्य ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत आज ४०८ जण बाधित आढळून आले. नगर शहर ३०, अकोले १, जामखेड २, कर्जत ३, कोपरगाव ६६, नगर ग्रामीण ५, नेवासा ३४, पारनेर ५२, पाथर्डी १७, राहाता ९, राहुरी ८६, संगमनेर २५, शेवगाव २, श्रीगोंदा ५८, श्रीरामपूर १० आणि इतर जिल्हा ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
------------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : १,६०,६८६
उपचार सुरू असलेले रुग्ण : २२३९०
मृत्यू :२१२८
एकूण रुग्णसंख्या :१,८५,२०४
-------------
पोर्टलवर ५७ मृत्यूची नोंद
जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर सोमवारी ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारच्या अहवालात एकूण मृत्यूची संख्या २०७१ इतकी नमूद करण्यात आली होती. सोमवारी त्यात वाढ होऊन एकूण मृत्यूची संख्या २१२८ इतकी दाखविण्यात आल्याने ५७ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, ५७ मृत्यू हे दोन-तीन दिवसांमधील एकूण मृत्यू असल्याचे आरोग्य यंत्रणेच्या सूत्रांनी सांगितले.