वीटभट्टीधारकांच्या निष्काळजीपणामुळे शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:20 AM2021-04-10T04:20:05+5:302021-04-10T04:20:05+5:30
पानसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, घुलेवाडीच्या हद्दीत खांजापूर रस्ता, मालुंजकर मळा, राऊत मळा, मालदाड रस्ता हा परिसर ...
पानसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, घुलेवाडीच्या हद्दीत खांजापूर रस्ता, मालुंजकर मळा, राऊत मळा, मालदाड रस्ता हा परिसर पूर्णपणे वीटभट्ट्यांनी भरलेला आहे. त्यामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. वीटभट्ट्यांसाठी वापरली जाणारी पांढरी राख हवेत पसरून पिकांवर बसते, ग्रामस्थांच्या डोळ्यातही राख जाते. गंधकयुक्त कोळसा हा भट्टीचे जळण म्हणून वापरला जातो. त्याचा धूर सर्वत्र पसरतो. त्यामुळे पर्यावरणाबरोबरच मानवी आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत अनेकदा ग्रामपंचायत, तहसील, आरोग्य अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. शेतीचा, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असूनही या संदर्भाने कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे घुलेवाडी शेतकरी, ग्रामस्थ संतप्त झाले असून, उपोषणाचा इशारा दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.