बीजीआरएलच्या गॅस पाईपलाईनमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:33 AM2021-05-05T04:33:11+5:302021-05-05T04:33:11+5:30

श्रीगोंदा : लिंपणगाव-श्रीगोंदा -देऊळगाव -भानगाव- ढोरजे-कोथूळ-कोळगाव-चिखली- मार्गे खडकीपर्यंत जाणाऱ्या बीजीआरएल या गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी ...

Damage due to BGRL's gas pipeline | बीजीआरएलच्या गॅस पाईपलाईनमुळे नुकसान

बीजीआरएलच्या गॅस पाईपलाईनमुळे नुकसान

श्रीगोंदा : लिंपणगाव-श्रीगोंदा -देऊळगाव -भानगाव- ढोरजे-कोथूळ-कोळगाव-चिखली- मार्गे खडकीपर्यंत जाणाऱ्या बीजीआरएल या गॅस पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन केले जात नाही. त्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे रीतसर भूसंपादन करून मोबदला मिळवून देण्यासाठी लढा उभारणार आहे, अशी माहिती माजी आमदार राहुल जगताप यांनी दिली. पाईपलाईनचे ठेकेदार बळाच्या जोरावर काम करत आहेत. ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून वरील गावातील त्रस्त शेतकऱ्यांनी राहुल जगताप यांची भेट घेऊन व्यथा मांडली. तालुक्यामध्ये गॅस पाईपलाईनचे काम चालू आहे. ठेकेदार कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्यांच्या शेतीमधून जवळपास १.५ मीटर रुंद व २ मीटर खोलीचा चर घेत आहेत. यामध्ये कसल्याही प्रकारचे भूसंपादन झालेले नाही तसेच कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई ठेकेदार देत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Damage due to BGRL's gas pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.