पालखेड कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील बंधारे भरून द्यावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:19 AM2021-04-13T04:19:16+5:302021-04-13T04:19:16+5:30

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील पालखेड कालव्याचे पाणी येवला तालुक्यातील बोकटेपर्यंत आलेले आहे. याच कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांतील बंधारे ...

Dams in Kopargaon taluka should be filled from Palakhed canal | पालखेड कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील बंधारे भरून द्यावेत

पालखेड कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील बंधारे भरून द्यावेत

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील पालखेड कालव्याचे पाणी येवला तालुक्यातील बोकटेपर्यंत आलेले आहे. याच कालव्यातून कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांतील बंधारे तातडीने भरून द्यावे, अशी मागणी भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघातील पूर्व भागातील तिळवणी, सावळगाव, शिरसगाव, आपेगाव ही गावे पालखेड कालवा लाभक्षेत्रात येतात. जिरायती भागातील ही गावे वर्षानुवर्षे दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विहिरी कोरड्या झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागासाठी पालखेड कालव्यातील पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल.

Web Title: Dams in Kopargaon taluka should be filled from Palakhed canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.