वादळी पाऊस : संगमनेरात दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:40 PM2018-06-02T15:40:07+5:302018-06-02T15:40:50+5:30
संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अचानक सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे काही लोकांच्या घरावरील छत उडून गेले .त्याचप्रमाणे विजेच्या तारा व खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित राहिला. काही शेतकऱ्यांचे कांदे पाण्यात भिजले. या वादळी पावसामुळे दोघे जखमी झाले.
संगमनेर : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अचानक सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे काही लोकांच्या घरावरील छत उडून गेले .त्याचप्रमाणे विजेच्या तारा व खांब पडल्याने वीज प्रवाह खंडित राहिला. काही शेतकऱ्यांचे कांदे पाण्यात भिजले. या वादळी पावसामुळे दोघे जखमी झाले.
काल दुपारी तीनच्या सुमारास प्रचंड वादळीवाºयासह व विजांच्या कडकडाटात वडगाव पान येथे पाऊस दाखल झाला. तळेगाव फाट्यावर रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांचे शेड उडून गेले. हाडकीचा ओढा ते कोकणगाव शिवहद्दीतील शेतकरी व लोकांचे प्रचंड नुकसान झाले. अलका गोरख थोरात, रावसाहेब भिकाजी थोरात, अनिल लक्ष्मण थोरात, पंडीत लक्ष्मण थोरात, भाऊसाहेब रामचंद्र थोरात यांचे घरावरील पत्र्याचे छत उडून गेले. घरातील संसारपयोगी वस्तू पाण्यात पाण्यात वाहून गेल्या.रत्नाबाई राजाराम थोरात यांचे अंगावर झाड पडल्याने त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे मारुती त्र्यंबक थोरात यांचे पायाला पत्रा उडून लागल्याने गंभीर इजा झाली आहे.