काष्टी येथील दांगट परिवाराने कन्येचा विवाह लावून पाच मुलींना घेतले शिक्षणासाठी दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 04:24 PM2020-07-05T16:24:25+5:302020-07-05T16:25:08+5:30

विवाह साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब कुटुंबातील ५ मुलींना दांगट परिवाराने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.

The Dangat family in Kashti married a girl and adopted five daughters for education | काष्टी येथील दांगट परिवाराने कन्येचा विवाह लावून पाच मुलींना घेतले शिक्षणासाठी दत्तक

काष्टी येथील दांगट परिवाराने कन्येचा विवाह लावून पाच मुलींना घेतले शिक्षणासाठी दत्तक

काष्टी : काष्टी येथील अनिलराव दांगट यांची कन्या प्रियंका व नगर येथील महेश पाटील यांचे चिरंजीव रोहीत यांचा विवाह साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब कुटुंबातील ५ मुलींना दांगट परिवाराने शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे.
लॉकडाऊनमुळे दांगट परिवाराने साखर पुडा कार्यक्रम आयोजित केला. विवाहाचा मुहूर्त नंतर काढण्याचा निर्णय घेतला़ पण मित्र-नातेवाईकांच्या विनंतीमुळे साखरपुड्यातच विवाह लावण्यात आला. या विवाहाची सदैव आठवण रहावी म्हणून दांगट परिवाराने पाच मुलींना शिक्षणासाठी दत्तक व अग्नीपंख फौंडेशनला मदत करणार असल्याचे सांगितले.

Web Title: The Dangat family in Kashti married a girl and adopted five daughters for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.