टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

By Admin | Published: April 7, 2017 02:55 PM2017-04-07T14:55:37+5:302017-04-07T14:55:37+5:30

शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो.

Danger Crisis: 20 days of stock left | टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

टंचाईचे संकट : २० दिवसांचा साठा शिल्लक

परगाव : कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचे नियोजन दरवर्षी कोलमडते. शहरासाठी नगरपालिकेने उभारलेल्या ४ साठवण तलावांमध्ये सद्य:स्थितीत एकूण २३ कोटी २० लाख लिटर इतकाच साठा शिल्लक असल्याने ६ दिवसाआड पाणी मिळत आहे. त्यातून शहराला केवळ २० दिवस पाणी पुरवठा होऊ शकतो. त्यातच तब्बल ५१ टक्के पाण्याची तूट होत असल्याने यंदाच्या कडक उन्हाळ्यात कोपरगावकरांवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ७० हजारावर आहे. शहराला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी नगरपालिकेने एकूण ८.२० दलघफू क्षमतेचे ४ साठवण तलाव बांधले आहेत. मात्र त्यात सध्या २३ कोटी २० लाख लिटर इतके पाणी शिल्लक आहे. प्रती माणसी १०० लिटर पाणी देण्याचे पालिकेचे धोरण आहे. त्यानुसार शहराला दररोज ११ लाख २५ हजार लिटर पाणी लागते. परंतु बाष्पीभवन, वहनातील तूट, गाळाने तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. तर तब्बल ५१ टक्के पाणी गळतीत वाया जाते. सध्या शहराला ६ दिवसाआड केवळ ४५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात आहे. शिल्लक पाणी साठा किमान २० दिवस पुरेल इतका आहे. पाणी योजनांवरील २ जलशुध्दीकरण केंद्रे चालू असून नवीन ४२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असल्याने लवकरच तेही कार्यान्वित होईल. गोदावरी कालव्यांना पाणी आल्यास ४ दिवसाआड पाणी पुरवठा करता येतो. मागील वर्षी उन्हाळ्यात २१ दिवसाआड पाणी पुरवठा केला गेला. पालिकेवर तीच नामुष्की पुन्हा ओढावण्याची भीती आहे.शहर हद्दीबाहेर २५ लाख लिटर पाणी औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना ३ लाख लिटर पाणी दिले जाते. तर शहर हद्दीबाहेर शिवारातील ओम नगर, शंकर नगर, कर्मवीर नगर, द्वारका नगर व गवारे नगर तसेच जेऊर पाटोदा व कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत २५ लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो. १५ मेपर्यंत शिल्लक पाणी साठा पुरणार नगरपालिकेने उपलब्ध पाणी साठ्यांचा विचार करता ४ दिवसाआड पाणी पुरवठा केल्यास २ मे, ५ दिवसाआड केल्यास ९ मे व ६ दिवसाआड केल्यास १५ मेपर्यंत शिल्लक साठा उपयोगात आणता येईल. पाटबंधारे खात्याने गोदावरी नदीला १९ मे रोजी आवर्तन सोडण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे १५ ते १९ मे दरम्यान ४ दिवस निर्जळी राहणार आहे.

Web Title: Danger Crisis: 20 days of stock left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.