रुईछत्तिसीच्या धोकादायक शाळा इमारतीला निधी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:10+5:302021-02-09T04:23:10+5:30
रुईछत्तिसी : रुईछत्तिसी (ता. नगर) येथील प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही ...
रुईछत्तिसी : रुईछत्तिसी (ता. नगर) येथील प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनली आहे. शाळेच्या इमारतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही निधी उपलब्ध करून दिला जात नाही, अशा व्यथा ग्रामस्थांनी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यापुढे मांडली.
कर्जत दौऱ्यावर असताना त्यांनी रुईछत्तिसी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. ग्रामस्थांनी गावातील विविध समस्यांचे निवेदन त्यांना दिले. जलसंधारण बंधारा, मारुती मंदिर सभा मंडप, प्राथमिक शाळेला नवी इमारत व्हावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, तालुका प्रमुख रवीण पिंपळे, सरचिटणीस प्रकाश बेरड, पंचायत समिती उपसभापती रवींद्र भापकर, शिक्षक समितीचे तालुका प्रमुख जालिंदर खाकाळ, प्रवीण गोरे, दीपक गोरे, संजय गोरे, राजकुमार गोरे, कैलास भांबरे, प्रतीक शिंगवी, विठ्ठल खाकाळ, सोमनाथ कुटे, आदी उपस्थित होते.
----
प्राथमिक शाळेच्या वर्गखोल्या मंजूर करण्यासाठी मंत्री बच्चू कडू यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून इतर विकासकामे मार्गी लावण्यासाठीही प्रयत्नशील आहोत.
- दीपक गोरे,
अध्यक्ष, प्रहार संघटना, रुईछत्तिसी