वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली

By अरुण वाघमोडे | Published: September 16, 2023 09:38 AM2023-09-16T09:38:38+5:302023-09-16T09:39:05+5:30

वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी शनिवारी रात्री या खांबांवर मशाल व टेंभे लावून अंदोलन केले.

Darkness on the road for a year! Since there are no street lights, torches are mounted on poles | वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली

वर्षभरापासून रस्त्यावर अंधार! पथदिवे नसल्यामुळे खांबांवर लावल्या मशाली

अहमदनगर: नगर शहरातील टीव्ही सेंटर ते गुलमोह रोड चौकापर्यंत बसविण्यात आलेल्या खांबांवर अद्यापही दिवे लावलेले नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या रस्त्यावर अंधार आहे. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका दखल घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी शनिवारी रात्री या खांबांवर मशाल व टेंभे लावून अंदोलन केले.

गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने नगरसेविका सोनाबाई शिंदे यांचे निधीतून पथदिवे  बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे. महापालिका प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्यावर पथदिव्यांसाठी खांब बसवले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून हे खांब उभे करण्यात आले आहेत. मात्र, त्यावर पथदिवे न बसवल्याने या रस्त्यावर संपूर्ण अंधार असतो. सतत छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच गणेशोत्सवाला अवघे ५ दिवस राहिलेले आहेत. 

उपनगरमधील गणेश विसर्जन मिरवणूक याच मार्गावरून काढली जाते. नागरीक पथदिवे बसवण्यासाठी वारंवार मागणी करत आहेत. तरीही अधिकारी या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी या खांबांवर मशाल व टेंभे लावून आंदोलन केले आहे. महापालिकेने खाजगी कंपनीकडून तात्काळ पथदिवे बसवून घ्यावेत. खाजगी कंपनी दिवे बसवत नसेल, तर नगरसेविका शिंदे यांच्या निधीतून हे दिवे बसवावेत. 

मात्र, गणेशोत्सवापूर्वी पथदिवे न बसवल्यास कोणत्याही क्षणी अज्ञातस्थळी आत्मदहन आंदोलन केले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. या आंदोलनात नगरसेविका शिंदे, सतीश शिंदे, संतोष लोखंडे, प्रशांत वाघ, मनीष शिंदे, प्रमोद कुलकर्णी, ओंकार आरडे, कुणाल पडजाते, डॉ. म्हस्के, निलेश चिप्पा, सागर शिंदे, गणेश शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे आदींसह नागरीक सहभागी झाले होते.

Web Title: Darkness on the road for a year! Since there are no street lights, torches are mounted on poles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.