पिंपळगाव पिसा येथे बिबट्याचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 11:58 AM2020-04-19T11:58:42+5:302020-04-19T11:59:38+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुताळ मळा शिवारात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास काही युवकांना बिबट्याचे दर्शन झाले. या युवकांनी त्या बिबट्यावा मोबाइलमध्ये कैद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील कुताळ मळा शिवारात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास काही युवकांना बिबट्याचे दर्शन झाले. या युवकांनी त्या बिबट्यावा मोबाइलमध्ये कैद केले.
याबाबत सायंकाळी शेतकरी युवक राजेंद्र गवळी, बिभीषण कुताळ, सचिन कुताळ व गजानन कुताळ शेतात गेले असता त्यांना बांधावरील रस्त्यावर बिबट्या दिसला. त्यांनी त्या बिबट्याचे मोबाइल शुटींग काढले. मात्र अंधारामुळे ते अस्पष्ट आले. सदर बिबट्याचे गेल्या दोन महिन्यात अनेकांना दर्शन झाले. त्या परिसरात विसापूर व कुकडीच्या पाण्यामुळे ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याला चांगल्यापैकी दडपण आहे. त्या ऊसाचे फडात रान डुकरांचे प्रमाणही जास्त असल्याने बिबट्याला भक्ष्याच्या शोधात फार बाहेर पडावे लागत नाही. त्या बिबट्याने अद्याप कोणत्याही पाळीव प्राण्यांवर हल्ला केला नाही. मात्र त्याचे सततच्या दर्शनाने लोकांच्यात दहशत तयार झाली आहे. तो बिबट्या एकटा
नसून त्याची तीन-चार पिले असल्याचे कुकडी कारखान्याचे शेतकी अधिकारी सुभाष कुताळ यांनी सांगितले. दरम्यान कुताळ मळ्यातील युवकांनी तयार केलेल्या व्हिडिओत बिबट्या दिसत आहे. रविवारी सकाळी पिंजरा लावण्यात येईल, असे विसापूरचे वनरक्षक संदीप भोसले यांनी सांगितले.