आतापर्यत अहमदनगर शहरात सर्वाधिक ३३ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 03:18 PM2019-04-23T15:18:50+5:302019-04-23T15:20:45+5:30
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 1 वाजेपर्यत 28 टक्के मतदान मतदारसंघात झाले. आतापर्यत सवार्धिक मतदान अहमदनगर शहरात झाले असून श्रीगोंदा व शेवगावमध्ये २६ टक्के मतदान झाले आहे.
शेवगावमध्ये २६ टक्के, राहुरी २७ टक्के, पारनेर २९ टक्के, अहमदनगर शहर ३२ टक्के, श्रीगोंदा २६ तर कर्जत-जामखेडमध्ये २९ टक्के मतदान झाले. सरासरी २८.३४ टक्के मतदान झाले.
शेवगाव विधानसभा मतदारसंघात ८९ हजार १०१ मतदारांनी मतदान केले. राहुरी मतदारसंघात ८० हजार ४५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पारनेर मतदारसंघात ९३ हजार ५८३ लोकांनी मतदान केले. अहमदनगर शहरात ९४ हजार ९४५ मतदारांनी मतदानाचा हक्क नोंदवला. श्रीगोंदा मतदारसंघात ८३ हजार २८५ तर कर्जत-जामखेड मतदारसंघात ९३ हजार २८५ मतदारांनी मतदान केले.