उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:28 PM2017-10-27T12:28:54+5:302017-10-27T12:33:22+5:30

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची १४ आॅक्टोबरनंतर जाहीर झालेली २९ आॅक्टोबरची तारीख म्हणजे पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. ...

Date of date of flight of the flyover; Gadkari will not even bhoomipujan | उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन

उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची तारीख पे तारीख; गडकरीही करणार नाहीत भूमिपूजन

अहमदनगर : शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाची १४ आॅक्टोबरनंतर जाहीर झालेली २९ आॅक्टोबरची तारीख म्हणजे पुन्हा एकदा फुसका बार ठरला आहे. २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्ह्यात येणार असले तरी ते उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार नाहीत. पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रत्यक्ष काम सुरु झाल्यानंतर भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे सांगून आता पुढच्या तारखीची प्रतीक्षा वाढवली आहे.
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने मुंबईत बैठक घेतल्यानंतर खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार असल्याची नवी तारीख जाहीर केली होती. मात्र गडकरी हे २९ आॅक्टोबरला संगमनेर, शनि शिंगणापूरच्या दौ-यावर असून त्यांनी नगरकडे पाठ फिरवली असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये झालेल्या महापौरांच्या फराळ कार्यक्रमात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी उशीर झाला तरी प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतरच भूमिपूजन होईल, असे स्पष्ट केले. उड्डाणपूल होणारच आहे. मात्र सर्व प्रक्रिया व प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर भूमिपूजन होईल, अशी ग्वाही दिली. त्यामुळे २९ आॅक्टोबरला उड्डाणपुलाचे भूमिपूजन होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

खासदारांचा थाट... पालकमंत्र्यांचा स्नेहाचा ‘पूल’

खा. दिलीप गांधी यांनी आयोजित केलेल्या फराळ कार्यक्रमास पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हजेरी लावून आपसातील ‘स्नेह’ वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. शहराच्या आस्थेचा विषय असलेल्या उड्डाणपुलाबाबत पालकमंत्र्यांनी मात्र तेथे ‘ब्र’ही काढला नाही. महापौर सुरेखा कदम यांच्याकडील फराळ कार्यक्रमात मात्र उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाबाबत पालकमंत्र्यांनी ग्वाही दिल्याने शिवसेनेचाही ऊर भरून आला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्नेहाचा पूल नेमका कुठे बांधला? याची चर्चा सुरू झाली. खासदार गांधी यांच्याकडील फराळ कार्यक्रम म्हणजे शाही लग्नाचाच थाट होता. हा थाटमाट पाहून कर्डिलेही चांगलेच भारावले. हा शाही थाट पाहून ‘पुढच्या वेळीही तुम्हीच खासदार होणार. कामाची दखल घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागावी’ अशी शुभेच्छा देण्यासही कर्डिले विसरले नाहीत.

Web Title: Date of date of flight of the flyover; Gadkari will not even bhoomipujan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.