अद्ययावत ज्ञान हाच अध्यापकांचा परिचय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:08+5:302021-07-07T04:26:08+5:30
कर्जत : नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व सामर्थ्यानिशी आपल्या विषयातील नवनवीन संशोधन करावे. कारण अद्ययावत ज्ञान हाच अध्यापकांचा खरा परिचय ...
कर्जत : नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व सामर्थ्यानिशी आपल्या विषयातील नवनवीन संशोधन करावे. कारण अद्ययावत ज्ञान हाच अध्यापकांचा खरा परिचय असतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी केले.
डॉ. आशा कदम (वनस्पती शास्त्र) यांना पाँडेचरी येथील नोवेल रिसर्च अकॅडमीतर्फे एप्रिल २०२१ मधील ‘उत्कृष्ट महिला शास्त्रज्ञ’ म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच मेजर प्रा. संजय चौधरी यांना राजस्थानच्या जे.जे.टी. विद्यापीठाकडून ‘मिलिटरी सायन्स इन एन.सी.सी.’ या विषयात संशोधन केल्याबद्दल पीएच.डी. प्रदान करण्यात आली. संस्कृती जयदीप शिंदे या बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने तेलंगणा येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी मुली संघास तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल महाविद्यालयाने संयुक्त गौरव समारंभ आयोजित केला होता. या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. कदम, प्रा. डॉ. चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. भास्कर मोरे, उपप्राचार्य डॉ. महेंद्र पाटील, डॉ. संदीप पै, कार्यालय प्रमुख विलास मोढळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. संतोष लगड यांनी केले. प्रा. डॉ. प्रमोद परदेशी यांनी आभार मानले.
---
०५ कर्जत दादा पाटील
कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयात शिक्षक, विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.