लेकीनं जिंकलं... कारखान्यातील कामगाराच्या मुलीला अमेरिकन कंपनीचे ४५ लाखांचे पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:11 AM2022-03-22T11:11:21+5:302022-03-22T11:25:54+5:30
मनीषाचे वडील हरचंद आणि अनिता राठोड हे दाम्पत्य औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील बंजारा तांडा येथील मूळचे रहिवासी आहेत
श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगावपिसा येथील कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्यातील कामगार हरचंद राठोड यांची सॉफ्टवेअर इंजिनिअर झालेली मुलगी मनीषा हिला अमेरिकेतील कंपनीने ४५ लाखांचे पॅकेज दिले आहे.
मनीषाचे वडील हरचंद आणि अनिता राठोड हे दाम्पत्य औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील वरखेडी येथील बंजारा तांडा येथील मूळचे रहिवासी आहेत. रोजगारासाठी ते २०१२ साली कुकडी साखर कारखान्यात कामाच्या शोधार्थ आले व येथेच कारखान्यावर स्थायिक झाले. मनीषा हिने श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पाॅलिटेक्निक महाविद्यालयातून इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. दरम्यान लग्नानंतर मनीषाने शिक्षण सुरू ठेवले, अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच तिला अमेरिकेतील कंपनीत नोकरीची संधी मिळाली. या यशाबद्दल मनीषा हिचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, निरीक्षक सुरेश गोलांडे, प्राचार्य अमोल नागवडे यांनी कौतुक केले आहे.
----------------------
मला शिक्षण घेता यावे म्हणून माझ्या आई-वडिलांनी फार कष्ट घेतले. माझी अमेरिकन कंपनीत निवड झाली असली तरी भविष्यात मला भारतामधील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये नवे संशोधन करण्याची इच्छा आहे.
-मनिषा हरचंद राठोड.