दौलतराव पवार यांचे आयुष्य पाणी प्रश्नावर समर्पित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:09+5:302021-02-16T04:21:09+5:30
येथील आगाशे सभागृह येथे नुकतेच निधन पावलेल्या दौलतराव पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यात आमदार कानडे बोलत ...
येथील आगाशे सभागृह येथे नुकतेच निधन पावलेल्या दौलतराव पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यात आमदार कानडे बोलत होते. यावेळी माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, जि.प.सदस्य शरद नवले, अरुण नाईक, सचिन गुजर, कामगार नेते अविनाश आपटे, इंद्रनाथ थोरात, डॉ.वंदना मुरकुटे, डॉ.वसंत जमधडे आदी उपस्थित होते.
आमदार कानडे म्हणाले की, दौलतराव पवार हे सर्वसामान्यांचे नेते होते. कोणताही प्रश्न मुळापासून समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्याकरिता प्रचार केला. या निवडणुकीतही आशीर्वाद दिले.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दौलतराव यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९८५ मध्ये विधानसभेवर जाण्याची त्यांना संधी मिळाली. त्यानंतर १९९०च्या निवडणुकीत दौलतराव यांनी मला मदत केली. पाणी प्रश्नावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता, असे ते म्हणाले.
समुद्रात वाहून जाणारे घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविता येऊ शकते. त्यामुळे नगर व मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायमचा निकाली निघेल. याकरिता सरकारकडे सर्वप्रथम पाठपुरावा करणारे दौलतराव पवार हे नेते होते. मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात टपरीधारकांना वीज जोडणी देण्याचा त्यांनी उपक्रम राबविला, अशा आठवणी मान्यवरांनी व्यक्त केल्या.
अविनाश आदिक, नगराध्यक्ष आदिक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार, भाजप तालुकाध्यक्ष बबनराव मुठे, रईस जहागीरदार, कामगार नेते नितीन पवार, शिवसेनेचे सचिन बडधे, गंगाधर देसाई, डॉ.राजाराम जोंधळे, रमण मुथ्था आदी उपस्थित होते.