दौंड - मनमाड मार्गावरील पॅसेंजर १६ जुलैपर्यत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 02:22 PM2018-06-19T14:22:52+5:302018-06-19T14:23:22+5:30
दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर २५ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या आहे. दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणा-या चार पॅसेंजर बंद आहे.
विसापूर : दौंड - मनमाड रेल्वे मार्गावरील पॅसेंजर २५ एप्रिलपासून बंद करण्यात आल्या आहे. दौंड-नांदेड, नांदेड-दौंड, पुणे-निजामाबाद व निजामाबाद-पुणे या दिवसा चालणा-या चार पॅसेंजर बंद आहे.
सुरवातीला एक महीना या पॅसेंजर बंद राहणार होत्या. २३ मे रोजी या पॅसेंजर नियमित वेळेनुसार चालू होतील, असे रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकाच्या नोटीस बोर्डावर सुचीत करण्यात आले होते. परंतु तारीख वाढवून (दि.१६) जुन पर्यंत या रेल्वे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु १६ जुनलाही पॅसेंजर चालु न करता रेल्वे प्रशासनाने पुन्हा पॅसेंजर सुरु करण्यासाठी १६ जुलैची डेटलाईन दिली आहे. दौंड-नगर दरम्यान काही जलद व धिम्या लोकल सुरु करण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.