संगमनेर, घारगावात आढळले मृत कावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:26+5:302021-01-20T04:21:26+5:30

प्रवरा नदी परिसरातील घाटावर पहाटे, सकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला जातात. यातील काही नागरिकांना गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी गंगामाई घाट ...

Dead crows found in Sangamner, Ghargaon | संगमनेर, घारगावात आढळले मृत कावळे

संगमनेर, घारगावात आढळले मृत कावळे

प्रवरा नदी परिसरातील घाटावर पहाटे, सकाळी नागरिक मोठ्या संख्येने फिरायला जातात. यातील काही नागरिकांना गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी गंगामाई घाट परिसर व इतर ठिकाणी

कावळे मृतावस्थेत आढळून आले. याबाबत त्यांनी वनविभागाला कळविले. घारगाव ग्रामपंचायती समोर मंगळवारी एक मृत कावळा आढळून आला. रविवारी देखील तीन कावळे मृत आढळले. घारगावातील हायस्कूल परिसरातील मृत अवस्थेत आढळून आलेले तीन कावळे कुत्र्यांनी खाल्ल्याने ते तपासणीसाठी पाठवता आले नाहीत. कावळा मृत झाल्याची माहिती घारगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाकचौरे यांना कळविल्यानंतर त्यांनी येऊन मृत कावळ्याची तपासणी केली. या कावळ्याच्या मृत्यूचे निदान न झाल्याने अधिक तपासणीसाठी तो पुणे येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आला आहे, असे वाकचौरे यांनी सांगितले. दरम्यान, घारगाव ग्रामपंचायतीतर्फे ग्रामविकास अधिकारी अशोक बलसाने यांनी घारगाव परिसरातील पोल्ट्री धारकांना बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नोटीस बजावली आहे.

कोट

संगमनेर तालुक्यात २४ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर त्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पोल्ट्री धारकांनी मेलेल्या कोंबड्या कुठेही फेकू नयेत.

- डॉ. प्रशांत पोखरकर, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, संगमनेर

------

फोटो नेम : १९ संगमनेर कावळे

ओळ : मृत अवस्थेतील कावळे.

Web Title: Dead crows found in Sangamner, Ghargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.