श्रीरामपुरात आढळले मृत हरीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:12+5:302021-06-17T04:15:12+5:30
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत हरणाचा पंचनामा केला आहे. त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हे हरीण मादी जातीचे असून ...
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मृत हरणाचा पंचनामा केला आहे. त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. हे हरीण मादी जातीचे असून दोन वर्षे वयाचे असल्याची माहिती वनविभागाने दिली.
शहरालगत असलेल्या शेती महामंडळाच्या मळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हरीण आहेत. त्यांचा वावर अनेकदा दिसून येतो. सोबतच बिबट्यांची संख्याही आता वाढली आहे. खंडागळे वस्ती, बेलापूर ते दिघी रोड तसेच बेलापूर परिसरामध्ये या प्राण्यांचा वावर आहे.
सूर्यानगर भागात हरणाची बिबट्याने शिकार केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. हरणाच्या गळ्याला चावा घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र अहवालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान शहरातील लोकवस्तीमध्ये बिबट्या आल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.