मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना आढळले; निमगाव जाळी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 05:24 PM2020-02-16T17:24:19+5:302020-02-16T17:25:44+5:30

लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.

The dead infant was found walking around carrying dogs; Incidents in the Nimgaon network | मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना आढळले; निमगाव जाळी परिसरातील घटना

मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना आढळले; निमगाव जाळी परिसरातील घटना

आश्वी : लोणी-संगमनेर रस्त्यावर निमगावजाळी शिवारात नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे मृत अर्भक मोकाट कुत्रे घेऊन फिरताना सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्वी पोलीस मृत अर्भक टाकणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
निमगावजाळी शिवारातील हारिबाबा मंदिरासमोरील उसाच्या शेतातून नुकतेच जन्मलेले मृत अवस्थेतील अर्भक तोंडात घेऊन काही कुत्रे फिरत असल्याचे रविवारी (दि.१६ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आले.  यानंतर ग्रामस्थांनी या कुत्र्यांचा पाठलाग केला असता संपत खरात यांच्या शेतात अर्भक टाकून सर्व कुत्र्यांनी पळ काढला. यानंतर सदर अर्भक मृत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. याबाबतची माहिती पोलीस पाटील दिलीप डेंगळे यांनी आश्वी पोलीस स्टेशनला दिली. यावेळी पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तात्याराव वाघमारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृत अर्भक ताब्यात घेऊन ते उत्तरीय तपासणीसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुगणालयात दाखल केले होते. तपासाणीत हे पुरुष जातीचे अर्भक असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आले असावे. बेकायदेशीर गर्भपात करुन हे अर्भक येथे आणून टाकले असावे, अशी चर्चा नागरिकात सुरू होती. 

Web Title: The dead infant was found walking around carrying dogs; Incidents in the Nimgaon network

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.