नेवाशात सापडला बिबट्याचा मृत बछडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:33+5:302021-04-01T04:22:33+5:30
नेवासा : नेवासा बुद्रुक गावाच्या शिवारात उसाच्या पिकात एक आठ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला आहे. नेवासा बुद्रुकचे ...
नेवासा : नेवासा बुद्रुक गावाच्या शिवारात उसाच्या पिकात एक आठ महिन्यांचा बिबट्याचा बछडा मृतावस्थेत आढळून आला आहे.
नेवासा बुद्रुकचे शेतकरी विक्रम पवार यांची भालगाव रस्त्यावर वस्ती आहे. त्यांच्या शेती गट नंबर १९५ मधील उसाच्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला. पवार त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून ही माहिती दिली. वनपाल मुस्ताक सय्यद, वन कर्मचारी भीमराज पाठक, आसाराम कदम, एस. डी. विधाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
वनपाल सय्यद म्हणाले, बिबट्याचा बछडा हा ८ ते १० महिने वयाचा असावा. त्याच्या मानेवर दुसऱ्या प्राण्याच्या पंजाचे ओरखडे व त्यामुळे झालेल्या जखमा आढळून आल्या आहेत. त्याच्यापेक्षा मोठ्या बिबट्याशी त्याचे भांडण झाले असेल किंवा इतर प्राण्याने त्याला पंजाने मारले असावे, असे त्यांनी सांगितले. मृत बछडा मुकींदपूर (नेवासा फाटा) येथील निसर्ग परिचय केंद्रात आणण्यात आला असून, आज, गुरुवारी सकाळी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.