उन्हाळी सिंचन आवर्तनाचे पाणी अर्जाला १० मार्चपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:49+5:302021-03-08T04:20:49+5:30
भंडारदरा धरणात ९ हजार १३१ दशलक्ष घनफूट, तर निळवंडे धरणात ५ हजार ६४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यंदा दोन्ही ...
भंडारदरा धरणात ९ हजार १३१ दशलक्ष घनफूट, तर निळवंडे धरणात ५ हजार ६४५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. यंदा दोन्ही धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस मुबलक प्रमाणात पडल्याने भूगर्भातील पाणीपातळी चांगल्या प्रमाणात टिकून आहे. त्यामुळे रब्बीच्या दोन्ही सिंचन आवर्तनात पाण्याची मागणी नगण्य होती. त्यामुळे आवर्तनात कमी प्रमाणात पाणी खर्च झाले. उन्हाळी हंगामातील आवर्तनात वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढण्याची चिन्हे आहेत.
मार्च ते जूनपर्यंतच्या उन्हाळी हंगामात एकूण तीन आवर्तन दिली जाणार आहेत. फळबाग, अन्नधान्य, चारा, मागास पिकांसाठी शेतकऱ्यांनी १० मार्चपर्यंत पाणी अर्ज दाखल करताना मागील थकबाकी व्याजासह भरावी. मागील थकबाकी व्याजासह न भरल्यास पाणी अर्ज नामंजूर केला जाईल, अशी माहिती बेलपिंपळगाव सिंचन शाखेकडून देण्यात आली आहे.