अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 10:46 PM2018-12-08T22:46:32+5:302018-12-08T22:49:09+5:30

महापालिका निवडणुकीतील राजकीय वादातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला.

deadly attack on Shiv Sena worker in ahmednagar | अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

अहमदनगर: महापालिका निवडणुकीतील राजकीय वादातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास शहरातील कापड बाजारातील मोची गल्ली येथे ही घटना घडली. सेनेच्या महापौर सुरेखा कदम व भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या सुनबाई दीप्ती गांधी यांच्यात या प्रभागात लढत होत असून पैसे वाटपातून हे वाद झाले होते. या हल्ल्यात सागर विष्णू थोरात (वय २७) हा सेनेचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येथील आनंदऋषी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रभाग क्रमांक बारामध्ये मतदारांना पैसे वाटण्याच्या कारणातून शनिवारी सायंकाळी भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. याच वादातून सागर थोरात याच्यावर रात्री नऊच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला. यामध्ये सागरच्या छातील व डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथून खासगी रूग्णालयात नेण्यात आले. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

भाजपचे कार्यकर्ते माळीवाडा परिसरात मतदारांना पैसे वाटत होते. सागर थोरात यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजपचे कार्यकर्ते गुंडांना बरोबर घेऊन राजरोस पैसे वाटप करत असताना प्रशासन काहीच कारवाई करत नाही. भाजपचे सुवेंद्र गांधी आणि त्यांचे कार्यकर्ते दहशत निर्माण करत आहेत. 
- संभाजी कदम, माजी शहर प्रमुख, शिवसेना

हल्ल्यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आरोपात काहीच तथ्य नाही. घटना घडली तेव्हा मी व भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी नव्हतो. पोलीस प्रशासनाने दिलेला अंगरक्षक माझ्यासोबत होता. पोलीस त्यांनाही विचारू शकतात. उलट शिवसेनेचे कार्यकर्तेच भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध ठिकाणी दमदाटी करत आहेत. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासावेत. सत्य काय आहे ते बाहेर येईल.
-सुवेंद्र गांधी, नगरसेवक, भाजप (खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा)

Web Title: deadly attack on Shiv Sena worker in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.