विहिरीतील दगड कोसळून सावरगावातील मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 05:40 PM2019-03-20T17:40:20+5:302019-03-20T17:40:30+5:30
सावरगाव येथील आपल्या मावशीकडे राहत असलेल्या गोवर्धन विठ्ठल गंडे (वय-१५) या मुलाच्या डोक्यात विहीरीवरीचा दगड पडल्याने जागीच मृत्यू झाला.
जामखेड : सावरगाव येथील आपल्या मावशीकडे राहत असलेल्या गोवर्धन विठ्ठल गंडे (वय-१५) या मुलाच्या डोक्यात विहीरीवरीचा दगड पडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मयत गोवर्धन विठ्ठल गंडे (रा. चोरपुरी, ता. गेवराई, जिल्हा - बीड) हल्ली रा. सावरगाव, ता. जामखेड) हा लहाणपणीच त्याची आई वारली असल्याने तो सावरगाव येथील मावशी शितल व काका लक्ष्मण बाबासाहेब गोरे यांच्याकडे राहत होता. सोमवार (दि. १८) रोजी सकाळी तो शिऊर जवळील फाळकेवाडी या ठिकाणी कामा निमित्त गेला होता. याच दरम्यान संतोष फाळके यांच्या विहीरीचे काम सुरू होते. त्यावेळी गोवर्धन विहीरीत उतरला. याच वेळी विहीरीच्या वरील बाजुचा एक दगड त्याच्या डोक्यात पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्याला ग्रामस्थांनी तातडीने जामखेड ग्रामीण रुग्णालयत घेऊन गेले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मुत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.