दिलीप गांधी यांचे निधन - श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:20 AM2021-03-18T04:20:16+5:302021-03-18T04:20:16+5:30
- बाबासाहेब वाकळे, महापौर ...... - अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील दिलीप गांधी हे तीन वेळा खासदार राहिले. कोणताही राजकीय वारसा ...
- बाबासाहेब वाकळे, महापौर
......
- अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील दिलीप गांधी हे तीन वेळा खासदार राहिले. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी ग्रामीण भागात आपला वेगळा ठसा उमटविला. जिवलग मित्र गेल्याचे दु:ख आहे.
- प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा दक्षिण संपर्कप्रमुख, शिवसेना
...
- माजी खासदार दिलीप गांधी हे अत्यंत चांगल्या स्वभावाचे माणूस होते. ते तीन वेळा खासदार राहिले. त्यांचे अकाली निधन जिल्ह्याला चटका लावून गेले.
- राजेंद्र फाळके, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
.......
- नगरसेवक, उपनगराध्यक्ष, खासदार आणि केंद्रीय मंत्री अशा विविध पदांवर माजी खासदार दिलीप गांधी यांनी काम केले. ग्रामीण भागात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यांचे अकाली निधन नगर शहराला चटका लावून गेले. त्यांना नगर शहरवासीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली....
- संग्राम जगताप, आमदार, नगर शहर
....
- पक्षाशी एकनिष्ठ असलेला व पक्षाला जिल्ह्यात एक नंबरचे स्थान मिळवून देण्यासाठी झटणारा आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असणारा नेता असा अचानक निघून गेला. कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणारा नेता गेल्यामुळे सामान्यांना कुटुंबातील कर्ता माणूस गेल्याचे दु:ख झाले आहे.
- भानुदास बेरड, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप
.....
माजी खासदार दिलीप गांधी यांची भारतीय जनता पक्षातील वाटचाल माझ्यासाठी मार्गदर्शक होती. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांसाठी त्यांचे मार्गदर्शन सातत्याने मिळत होते. लोकसभेच्या निवडणुकीतील विजयात माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिलेली साथ सदैव स्मरणात राहील.
- डॉ. सुजय विखे, खासदार