बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:53+5:302021-03-31T04:21:53+5:30

कोपरगाव : तालुक्यातील मंजूर येथील सुधाकर तुकाराम कदम (वय ५२) हे २२ मार्चला नाशिक येथून दुचाकीवरून घरी येत असताना, ...

Death during treatment of a leopard attack wound | बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

कोपरगाव : तालुक्यातील मंजूर येथील सुधाकर तुकाराम कदम (वय ५२) हे २२ मार्चला नाशिक येथून दुचाकीवरून घरी येत असताना, सोमठाणाजवळील मेंढी नाल्यामध्ये सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने अचानक कदम यांच्या दुचाकीवर झेप घेत पायाचा चावा घेतला होता. या हल्ल्यात ते दुचाकीवरून खाली पडल्याने, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

प्रकृती गंभीर झाल्याने त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर सोमवारी (दि.२९) उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हलाकीची परिस्थिती असलेल्या कदम यांच्यावरील उपचारासाठी मजूर ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदत केली. मात्र, अथक प्रयत्नानंतरही त्यांचे निधन झाले. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Death during treatment of a leopard attack wound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.