कोपरगावात छावा क्रांतिवीर सेनेचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:24+5:302021-01-20T04:21:24+5:30
कोपरगाव : शहरातील तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १९) ...
कोपरगाव : शहरातील तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. १९) आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मुंबई-नागपूर मार्गास धर्मवीर छत्रपती संभाजी राजे समृद्धी महामार्ग नाव देण्यात यावे. कोपरगाव तालुक्यातील गायत्री कंपनीने अतिरिक्त उत्खनन केलेला दंड वसूल करून शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई करावी. गायत्री कंपनीने सब टेंडर दिलेल्या ठेकेदाराकडून परिसरातील वाहनमालकांचे पैसे बुडवून पळून गेले. ते पैसे व्याजासह मिळावे. यापुढे ज्या ठिकाणी उत्खनन करायचे असेल तेथील शेजारील शेतकऱ्यांचे संमतिपत्र घ्यावे. शासनाच्या नियमानुसार २१ फुटांपेक्षा खाली उत्खनन करण्यात येऊ नये. आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसानाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्याबरोबरच समृद्धीच्या वाहनांच्या धुळीने पिकांची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच अवजड वाहतूक बंद करण्यात यावी. यामुळे कोपरगाव तालुक्यात रस्ते खराब झाले आहे. तसेच खराब झालेल्या रस्त्यांची कामे करण्यात यावी, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे.
या उपोषणस्थळी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, भाऊसाहेब दहे, साहेबराव लांडगे, साईनाथ बोराटे, रावसाहेब काळे, राहुल कांगुणे, संदीप म्हैस, दीपक कदम, नईम शेख, श्याम शिंदे, योगेश शेटे, करण वाघ, बबन वाघुले, श्रीहरी लांडे, अभिजित वाघ, संतुलन चौधरी, दिलीप वायकर, सुभाष लांडगे, चंद्रभान सांगळे, विक्की वाघ, कार्तिक चौधरी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.
.................
फोटो १९- आमरण उपोषण, कोपरगाव
190121\img_20210119_163503.jpg
कोपरगावात तहसील कार्यालयासमोर छावा क्रांतिवार सेनेच्यावतीने विविध मागण्यासाठी मंगळवारी ( दि.१९) आमरण उपोषण सुरु करण्यात आले.